
(विशेष प्रतिनिधी):वडवणी तालुक्यातील पिंपळटक्का येथे एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावातीलच एका आशा वर्करने (ASHA Worker) महिलांना ‘सहा वर्षांत पैसे दामदुप्पट करून देतो’ असे आमिष दाखवून तब्बल ७० ते ८० महिलांकडून प्रत्येकी नऊ-नऊ हजार रुपये उकळले आहेत.
या घटनेला आता तब्बल १५ वर्षे पूर्ण झाली असून, अद्याप एकाही महिलेला त्यांचा कष्टाचा एक रुपयाही परत मिळालेला नाही. या आर्थिक फसवणुकीची आता सखोल चौकशी व्हावी, अशी जोरदार मागणी जोर धरू लागली आहे.
नेमका प्रकार काय? मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळटक्का (ता. वडवणी) येथील एका आशा वर्करने गावातील भोळ्याभाबड्या आणि गोरगरीब महिलांना गुंतवणुकीचे मोठे आमिष दाखवले. सहा वर्षांत तुमचे पैसे दुप्पट करून देईन, असा विश्वास देऊन तिने गावातील सुमारे ७० ते ८० महिलांकडून प्रत्येकी ९,००० रुपये जमा केले. विश्वासापोटी अनेक महिलांनी आपल्या पोटाला चिमटा काढून हे पैसे जमा केले. धक्कादायक बाब म्हणजे, या आशा वर्करने पैशांच्या बदल्यात दिलेले बॉण्ड (Bonds) देखील स्वतःकडेच जमा करून घेतले.
आज या घटनेला १५ वर्षे उलटून गेली आहेत, तरीही कोणत्याही महिलेला तिचे पैसे किंवा परतावा मिळालेला नाही.१५ हजार रुपये पगार, तरीही फसवणुकीची गरज काय?शासनाकडून या आशा वर्करला महिन्याकाठी १५ हजार रुपये मानधन मिळते. तरीही गावातील गोरगरीब महिलांच्या कष्टाच्या पैशांवर डल्ला मारण्याची गरज या आशा वर्करला का पडली? असा संतप्त सवाल आता गावकरी विचारत आहेत.
याशिवाय, सदर आशा वर्कर आपल्या नियमित कर्तव्यातही (ड्युटी) नेहमी कसूर करत असून ती कामावरही नियमित हजर राहत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
या फसवणुकीमुळे गावातील महिलांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हे सर्व पैसे गोरगरीब आणि शेतमजूर महिलांचे आहेत. त्यामुळे आता गावाच्या प्रथम नागरिकाने म्हणजेच सरपंचांनी यात तातडीने लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सरपंचांनी पुढाकार घेऊन या आशा वर्करकडून सर्व महिलांचे अडकलेले पैसे वसूल करून द्यावेत आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.
प्रशासनाने तातडीने चौकशी करावीआरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन सदर आशा वर्करची सखोल चौकशी करावी. १५ वर्षे उलटूनही पैसे न देणाऱ्या या प्रवृत्तीवर कायदेशीर कारवाई व्हावी आणि फसवणूक झालेल्या सर्व महिलांचा पैसा व्याजासह परत मिळावा, अशी आग्रही मागणी पिंपळटक्का येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे.
प्रशासनाने आता यात लक्ष न घातल्यास हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे.वडवणी तालुक्यात धक्कादायक प्रकार? दामदुप्पटच्या आमिषाने महिलांकडून लाखो रुपये जमा; १५ वर्षांनंतरही परतावा नाहीपिंपळटक्का ग्रामस्थांची चौकशीची मागणी; गोरगरीब महिलांचा पैसा परत मिळवून देण्याची सरपंचांकडे अपेक्षावडवणी | प्रतिनिधीवडवणी तालुक्यातील पिंपळटक्का गावात दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून गावातील अनेक महिलांकडून पैसे जमा केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. गावातील एका आशा वर्करने सहा वर्षांत रक्कम दुप्पट करून देण्याचे आश्वासन देत सुमारे ७० ते ८० महिलांकडून प्रत्येकी नऊ हजार रुपये जमा केल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. मात्र, या घटनेला तब्बल १५ वर्षे उलटून गेली असतानाही संबंधित महिलांना एकही रुपया परत मिळालेला नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.महिलांकडून लाखो रुपयांची रक्कम जमाग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आशा वर्करने गावातील महिलांचा विश्वास संपादन करून “सहा वर्षांत पैसे दुप्पट करून देण्यात येतील” असे सांगितले होते. या आश्वासनावर विश्वास ठेवून अनेक गोरगरीब, शेतमजूर आणि कष्टकरी महिलांनी आपल्या बचतीतून प्रत्येकी ९ हजार रुपये जमा केले. एकूण ७० ते ८० महिलांकडून लाखो रुपयांची रक्कम जमा झाल्याचे सांगितले जात आहे.बॉण्डही जमा करून घेतल्याचा आरोपमहिलांकडून पैसे घेतल्यानंतर त्यांना काही बॉण्ड देण्यात आले होते. मात्र, कालांतराने हे बॉण्डही संबंधितांकडून परत घेण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे महिलांकडे कोणताही ठोस पुरावा उरला नसल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समोर येत आहे.१५ वर्षांनंतरही परतावा नाहीया प्रकरणाला सुमारे १५ वर्षांचा कालावधी लोटला असला, तरी अद्याप एकाही महिलेला तिची मूळ रक्कम अथवा त्यावरील कोणताही परतावा मिळालेला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून महिलांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.सरपंचांनी पुढाकार घेण्याची मागणीगावातील महिलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांचे अडकलेले पैसे परत मिळणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यासाठी गावचे सरपंच आणि ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेऊन सर्व संबंधितांची बैठक आयोजित करावी व महिलांचे पैसे वसूल करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.प्रशासनाकडून चौकशीची अपेक्षासंबंधित प्रकरणाची आरोग्य विभाग, ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन सखोल चौकशी करावी, दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करावी आणि फसवणूक झालेल्या महिलांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी पिंपळटक्का ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.


