वडवणीत सकल मराठा समाजाचा रोष; वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

बातमी शेअर करा

वडवणी (बीड) मराठा समाजातील मुलींबद्दल नवनाथ वाघमारे यांनी केलेल्या अत्यंत आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद आता बीड जिल्ह्यात उमटू लागले आहेत. या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी वडवणी तालुक्यातील सकल मराठा समाजाने एकत्र येत थेट वडवणी पोलीस स्टेशनमध्ये धडक दिली.

समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आणि माता-भगिनींचा अपमान करणाऱ्या या बेजबाबदार वक्तव्याविरोधात सकल मराठा समाजाच्या वतीने रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच, अशा प्रकारची विधाने करून सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या संबंधितांवर प्रशासनाने तात्काळ आणि कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी या वेळी करण्यात आली.या संपूर्ण घटनेमुळे वडवणी परिसरात संतापाचे वातावरण असून, प्रशासनाकडून या प्रकरणी काय पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *