
कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाचा कौतुकास्पद पुढाकार; पिंपळटक्का येथे फवारणी व कीड व्यवस्थापनाचे विशेष प्रशिक्षण!वडवणी
(विशेष प्रतिनिधी):कृषी विभाग आणि कृषी व्यवस्थापन यंत्रणेच्या वतीने पिंपळटक्का येथे स्थानिक शेतकरी व शेतमजुरांसाठी कापूस पिकावर फवारणी करताना घ्यावयाची काळजी, कीटकनाशकांची हाताळणी आणि कीड व्यवस्थापन या विषयांवर आधारित विशेष कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.📍
मान्यवरांची उपस्थिती आणि मार्गदर्शनया प्रशिक्षण कार्यक्रमाला ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक एस. एम. साळवे आणि तालुका कृषी अधिकारी बी. एम. खेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक सुदर्शन आंधळे यांनी केले.कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून रावसाहेब भोंडवे आणि अमोल हुंबे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कापूस पिकावरील विविध किडींची ओळख कशी करावी आणि त्यांचे वेळीच नियंत्रण कसे मिळवावे, याबद्दल सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन केले.
🪲 कीटकनाशक ओळख आणि विमा विषयांवर चर्चामंडळ कृषी अधिकारी गोपाल ढाकणे यांनी शेतकऱ्यांना पीक विमा आणि योग्य कीटकनाशकांची ओळख कशी करावी, या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर मोलाचे मार्गदर्शन केले. कापूस पिकावर फवारणी करताना स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी आणि सुरक्षितपणे फवारणी कशी करावी, याचे प्रात्यक्षिकही या वेळी समजावून सांगण्यात आले.
🤝 अधिकारी व शेतकऱ्यांची मोठी उपस्थितीया महत्त्वपूर्ण प्रशिक्षण शिबिराला उपकृषी अधिकारी संदीप पाटील, पृथ्वीराज लांडे, गणेश बडे, अनंत फुटाणे तसेच सहाय्यक कृषी अधिकारी गोविंद खोत यांच्यासह कृषी विभागाचे इतर कर्मचारी आणि पिंपळटक्का परिसरातील महिला व पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी विभागाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.📲 ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा: ‘आय टी कदम बातमी आणि विचार’

