महापुरुषांचे स्मारक उभे करणारे बाळराजे आवारे पाटील यांच्या पाठीशी समाज कधी उभा राहणार? लवकरच होणार सुटका!

बातमी शेअर करा

बीड: छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि इतर अनेक थोर महापुरुषांची शेकडो स्मारके व पुतळे अत्यंत निष्पक्षपातीपणे आणि निष्ठेने उभे करणारे बाळराजे आवारे पाटील यांच्या सुटकेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

कायदेतज्ज्ञ ॲड. संतोष घोलप यांच्या प्रभावी आणि शक्तिशाली युक्तिवादामुळे बाळराजे आवारे पाटील यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला असून, त्यांची लवकरच कारागृहातून सुटका होणार आहे.

षड्यंत्र आणि अंतर्गत फितुरीचा फटकामिळालेल्या माहितीनुसार, बाळराजे आवारे पाटील यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणण्यासाठी ‘हाके आणि त्यांच्या टोळीने’ मोठे षड्यंत्र रचल्याचा आरोप समर्थकांकडून केला जात आहे. अत्यंत दुर्दैवी बाब म्हणजे, समाजातीलच काही अंतर्गत लोकांनी या षड्यंत्राला खतपाणी घातले आणि फितुरी केली. याच राजकीय आणि सामाजिक द्वेषातून बाळराजे यांच्यावर अनेक गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये जावे लागले, अशी भावना आता जनमानसात उमटत आहे.समाजाच्या कृतघ्नतेवर प्रश्नचिन्ह?बाळराजे आवारे पाटील यांनी स्वतःच्या जीवाची, कुटुंबाची आणि इज्जतीची परवा न करता अवघे आयुष्य समाजासाठी आणि महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी झिजवले. परंतु,

“समाज हा केवळ चालू घडाामोडींमधील तात्पुरत्या लोकांना लक्षात ठेवतो आणि ज्याने समाजासाठी सर्वस्व अर्पण केले, त्याला विसरून जातो,” अशीच काहीशी अनुभूती बाळराजे यांच्या बाबतीत येत आहे.ज्यावेळी बाळराजे आवारे पाटील यांनी गावोगानी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे पुतळे बसवले, त्यावेळी त्यांना डोक्यावर घेऊन नाचणारे आज ते संकटात असताना कुठे गायब झाले? त्यांच्याबद्दल तळमळ व्यक्त करताना का दिसत नाहीत? असा संतप्त सवाल निष्ठावंत शिवभक्तांकडून उपस्थित केला जात आहे.

ॲड. संतोष घोलप यांच्या युक्तिवादामुळे न्याय मिळाला!बाळराजे यांच्यावर विविध गंभीर कलमांखाली ४४ गुन्हे दाखल करून त्यांना घेरण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, प्रसिद्ध युवा नेते व कायदेतज्ज्ञ ॲड. संतोष घोलप यांनी कायद्याचा सखोल अभ्यास, पुराव्यांची अचूक छाननी आणि घटनात्मक हक्कांचा आधार घेत न्यायालयात भक्कम बाजू मांडली. त्यांच्या या ऐतिहासिक युक्तिवादामुळे अखेर सत्याचा विजय झाला असून न्यायालयाने बाळराजे आवारे पाटील यांना जामीन मंजूर केला आहे.सत्याचा विजय निश्चित!बाळराजे यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध सोशल मीडियावर देखील ‘#JusticeForBalaraje’ अशी मोहीम सुरू असून, त्यांच्या समर्थकांमध्ये आता आनंदाचे वातावरण आहे.

“काही काळ संकट आले तरी शेवटी सत्याचाच विजय होतो आणि बाळराजे आवारे पाटील अधिक ताकदीने पुन्हा समाजाच्या सेवेसाठी बाहेर येतील,” असा विश्वास त्यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केला आहे.जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *