
बीडच्या चिमुकल्यांची अंतराळात गरुडझेप! इस्रो व नासा निवड परीक्षेत पिंपळटक्का शाळेचा डंका बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपळटक्का येथील विद्यार्थ्यांनी ‘इस्रो व नासा केंद्रस्तरीय निवड परीक्षा २०२६’ मध्ये नेत्रदीपक यश संपादन केले आहे, केंद्र चिंचवन मधून शाळेतील तब्बल ६ गुणवंत विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.
या परीक्षेत श्रेयश दादाभाऊ कदम (९८ गुण), शिवम अजित कदम (९२ गुण), संकेत ज्ञानेश्वर यादव (८८ गुण), कार्तिक रामप्रसाद यादव (८२ गुण), श्रावणी हनुमंत कदम (८२ गुण) आणि तेजस्विनी तुकाराम कदम (७७ गुण) यांनी घवघवीत यश मिळवले आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हे यश संपूर्ण बीड जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असून भविष्यातील वैज्ञानिकांची ही नांदी मानली जात आहे.आय टी कदम बातमी आणि विचार सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तर्फे सर्व यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक आणि मार्गदर्शक शिक्षक यांचे मनापासून अभिनंदन व पुढील उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!
तुमच्या मते, ग्रामीण भागातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ विज्ञानाबद्दलची आवड आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी आणखी काय प्रयत्न करायला हवेत? आपले विचार
नक्की सांगा!
ISRO NASA BeedNews Vadvani ZPSchool Pimpaltakka #SpaceScience StudentAchievement ITKadamNews

