
‘जमिनी आमच्या, मग पाणी बंद का?’ – शेतकऱ्यांचा रोखठोक सवाल
सोन्नाखोटा धरणाच्या निर्मितीसाठी रुई (पिंपळा), पिंपळा (रुई), सोन्नाखोटा, पिंपळटक्का आणि खडकी या परिसरातील सुमारे 30 ते 35 टक्के जमिनी प्रशासनाने संपादित केल्या आहेत.
विशेष म्हणजे, जमिनी देऊन अनेक वर्षे उलटली तरी कित्येक शेतकऱ्यांना अद्याप संपादनाचा मोबदलाही मिळालेला नाही. उरलेल्या अवघ्या 70 ते 7५ टक्के जमिनीवर शेतकरी रात्रं-दिवस मेहनत करून, कर्ज काढून आपल्या कुटुंबाचा आणि पिकांचा सांभाळ करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये खरीप व रब्बी पिकांची पाणीपट्टी भरलेली असताना अचानक पाणी बंद करणे हा शेतकऱ्यांवर मोठा अन्याय आहे.
“एकाच्या ताटात लाडू दिसले म्हणून दुसऱ्याच्या ताटातले अन्न पळवणार का?” असा सवाल करत, ज्यांच्या जमिनीवर धरण उभारले गेले त्यांनाच हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवले जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. JPGलातूर पॅटर्न राबवा, पण पिके जळू देऊ नका!
पिण्याच्या पाण्याची अडचण लक्षात घेता सरकारने इतर पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांच्या कार्यकाळात लातूर शहरासाठी रेल्वेने पाणी आणून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. त्याच धर्तीवर प्रशासनाने पिण्याच्या पाण्यासाठी अन्य उपाययोजना कराव्यात, परंतु धरणाच्या जीवावर उभ्या राहिलेल्या पिकांच्या मुळावर उठू नये, अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतलेली आपल्याला आढळून येते, १५ दिवसांच्या स्थगितीची विनंती ऐन अंतिम टप्प्यात असलेली पिके वाचवण्यासाठी सोन्नाखोटा धरणातील पाणी उपसा मनाई आदेशाला किमान आणखीन पुढील काही दिवसाचा कालावधी द्यावा
पुढील काही दिवसांत परतीचा पाऊस आला नाही आणि पाणी उपसा बंद राहिला, तर शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होऊन ते कर्जबारीपणा व नैराश्यात ढकलले जातील, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे, या संपूर्ण प्रकाराची दखल घेऊन प्रशासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती या परिसरातील शेतकरी बांधवाकडून केली जात आहे

