
ग्रामपंचायतीच्या कामात लाटले लाखो रुपये; सरपंचांनी पुराव्यासह उघड केला ‘ब्लॅकमेलिंग’चा डाव
बीड जिल्ह्यातील पिंपळटक्का ग्रामपंचायतीमध्ये उपोषणाच्या नावाखाली सुरू असलेल्या राजकारणाचा आता थेट गावच्या सरपंचांनीच जाहीर खुलासा केला आहे. सरपंच संतोष कदम यांनी एक अधिकृत ‘प्रेस नोट’ जारी करून उपोषणकर्त्यांचा संपूर्ण कच्चाचिठ्ठा पुराव्यांसह समोर मांडला आहे.नेमके प्रकरण काय?सरपंचांनी दिलेल्या पुराव्यानुसार, उपोषणकर्त्यांनी विहिरीचे कोणतेही काम न करता वडिलांच्या नावावर ३ लाख ९१ हजार रुपये उचलल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये कलम ३५३, ३५४, ३७९ आणि ३२६ अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल असल्याचा दावा सरपंचांनी केला आहे. याशिवाय संबंधित व्यक्तीवर कलम ३७६ (बलात्कार) अंतर्गत गुन्हा दाखल असून, तो जामिनावर बाहेर असल्याचेही त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.सरपंचांची भूमिका:”आम्ही अशा ब्लॅकमेल करणाऱ्या आणि खंडणीखोर प्रवृत्तीला अजिबात भीक घालत नाही,” असे म्हणत सरपंच संतोष कदम यांनी प्रशासनाच्या कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, प्रशासनाने यापुढे अशा तक्रारदारांची सखोल उलट चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.सरपंचांच्या या अधिकृत खुलाशामुळे आणि त्यांनी मांडलेल्या कायदेशीर तथ्यांमुळे आता उपोषणकर्तेच पूर्णपणे अडचणीत आले आहेत. एका बाजूला सरपंचांची कार्यक्षमता आणि दुसरीकडे विरोधकांचे वैयक्तिक स्वार्थ, हे चित्र आता समोर आले आहे. यावर प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा ‘आयटी कदम बातमी आणि विचार’.


